हॉस्पिटल म्हणजे भुजबळांच जेल मधून बाहेर येण्याचं कार्ड

preeti sharma menon chagan bhujbal

टीम महाराष्ट्र देशा : प्रकृती खालावल्यामुळे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मात्र आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी भुजबळांच हॉस्पिटल मध्ये दाखल होणं म्हणजे जेल मधून बाहेर येण्याच कार्ड असल्याची टीका केली आहे. सध्या भुजबळ मनी लॉड्रिंग प्रकरणी तुरुंगात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोठडीत आहेत .

छगन भुजबळ यांना शनिवारी पोटदुखी, मधुमेह आणि दम्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थर रोड तुरुंगातून जेजे रुग्णालायत हलविण्यात आले. जेजेत आधी त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना सीसीयूत हलविण्यात आलं. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचाही आजार असल्याचं सांगण्यात आलं. प्रकृती बिघडत असल्याने मागच्या वर्षी भुजबळ यांना ३५ पेक्षा जास्त वेळा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.