अँकर अर्पिताच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

अँकर अर्पिता

मुंबई : मालाडमधील अँकर अर्पिता तिवारीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या मृत्यूनंतर तपास सुरु करण्यात आला त्यावेळी तिची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मालाडमधील पंधरा मजली इमारतीवरुन कोसळल्याने अर्पिताचा मृत्यू झाला होता. अर्पिता तिचा प्रियकर पंकज जाधव याच्याबरोबर राहत होती. अर्पिता हिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या मित्रमैत्रिणींनी सांगितले. मात्र तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला असल्यामुळे तिची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, असे मालवणी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक पठांगडे यांनी सांगितले.Loading…


Loading…

Loading...