अखेर ‘नाणार’ रद्द ; मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला

Uddhav-Thackeray-Devendra

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेने भाजप समोर युती करण्यासाठी ठेवलेल्या अटींपैकी महत्वाची अट म्हणजे ‘नाणार रद्द करावा’ आता भाजप-शिवसेनेची युती झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द अखेर पाळला आहे. नाणार प्रकल्प रद्द करत असल्याची अधिसुचना काढण्यात आली आहे. दरम्यान, नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता.

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करणार असल्याची घोषणा देखील, सुभाष देसाई यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 हजार हेक्टर तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 300 हेक्टर जमिनींच्या अधिग्रहणाची अधिसूचना काढली होती. पण, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत केल्या जाणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी देखील कोकण दौऱ्यावेळी नाणार होऊ देणार नाही, शिवसेना भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, युतीच्या घोषणेवेळी देखील उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.