रात्रीस खेळ चाले; आणखी एक पक्ष झाला भाजपमध्ये विलीन

bjp-flag-representational-image

पणजी : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामागे गोव्यात भाजपची राजकीय वाताहत होईल असा अंदाज लावला जात असताना अचानक गोव्याच्या राजकारणाने एक नवे वळण घेतले आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या दोन आमदारांनी मंगळवारी मध्यरात्री भाजपात प्रवेश करत महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचं भाजपमध्ये विलिनिकरण केल्याने गोव्यातील राजकारणात ट्विस्ट आला आहे.

आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचं भाजपात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे एकून तीन आमदार आहेत. यात आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. मात्र, पक्षाचे तिसरे आमदार सुदिन ढवळीकर यांनी या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर सही केली नाही. ढवळीकर हे सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.