आजोबा पारसी,वडिल मुस्लिम,आई ख्रिश्चन तरीही राहुल गांधी ब्राह्मण कसे ?

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुका आल्या की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जाहीर सभांमधून आरोप – प्रत्यारोप, टीका – टिपणी सुरु असते. पण या निवडणुकीत टीका करण्याचा व जाहीर सभांमध्ये बेताल वक्तव्य करण्याचा स्तर काहीसा खालावताना दिसत आहे. अशाच एका कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.काँग्रेसचे अध्यक्ष हे ब्राम्हण नाहीत तर ‘हायब्रिड’ व्यक्ती आहेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.

सिरसी इथं बोलत असताना हेगडे म्हणाले, राहुल यांचे वडिल मुस्लिम होते. त्यांचे आजोबा हे पारसी होते, आई या ख्रिश्चन आहेत. असं असताना ते स्वत:ला जाणवं घालणारे हिंदू कसे म्हणवून घेतात? असा सवाल त्यांनी केला. ते ब्राम्हण आहेत यासाठी राहुल गांधी DNA टेस्ट करतील का असा सवालही त्यांनी केला.

हेगडे पुढं म्हणाले, राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी जेव्हा DNA चाचणी करण्याची वेळ आली तेव्हा सोनिया गांधी यांनी चाचणीसाठी राहुल यांचं नाही तर प्रियांका गांधी यांचं रक्त घेण्यासाठी सांगितलं होतं असंही ते म्हणाले. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी भारताच्या हवाई हल्ल्याचे पुरावे कसे मागत आहेत असंही ते म्हणाले.