‘ते’ वादग्रस्त ट्विट माझं नाहीच, अनंतकुमार हेगडेंच्या कोलांट्याउड्या

Anant-Kumar hegade

टीम महाराष्ट्र देशा : साध्वीजी तुम्ही गोडसे प्रकरणावर माफी मागण्य़ाची गरज नाही. उलट या मुद्द्यावर आपण आक्रमक होण्याची गरज आहे, असं वक्तव्य हेगडे यांच्या ट्विटरवर दिसलं. मात्र आता माझं ट्वीटर अकाऊंट हॅक झालं असून ते ट्वीट मी केलंच नाही, असं स्पष्टीकरण अनंतकुमार हेगडेंनी दिलं आहे. याअगोदर हेगडेंनी आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

नथूराम गोडसे देशभक्त होते आणि नेहमीच देशभक्त राहतील, असं वादग्रस्त वक्तव्य साध्वीने केले होते. याप्रकरणी भाजपने साध्वींवर नाराजी व्यक्त केली होती. 70 वर्षानंतर का होईना बदललेल्या वैचारिक वातावरणात गोडसेंवर चर्चा होत आहे. गोडसेंनाही या चर्चेमुळे आनंद होत असेल’ असं लिहिल्याचं त्यांच्या ट्विटरवर दिसून आलं.

नेमकं काय आहे प्रकरण

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य अभिनेता कमल हसनने केले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे, अशा लोकांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळेल असं विधान केले होते.
भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल असे म्हटले होते.

त्यानंतर आता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं म्हटलं आहे. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे