रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याची शपथ घेतली होती – अनंत गीते

औरंगाबाद : रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याची शपथ घेतली होती. लोकसभा निवडणुकीत मला पाडण्याचे त्यांनी ठरवले होते. पण मी विरोधकांबरोबर स्वकीयांच्या विरोधात लढलो आणि जिंकून आलो, असा गौप्यस्फोट अनंत गिते यांनी केला.

औरंगाबादच्या शिवसेना शाखेच्या ३३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अनंत गिते बोलत होते. यावेळी  खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गिते पुढे बोलताना म्हणाले की, रामदास कदम तुम्ही मला संपवण्याची शपथ घेतली होतीत मात्र मी तुमच्या मुलाला आमदार बनवण्याची शपथ घेतो. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं आहे. गीते यांच्या या वक्तव्यमुळे रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यामधील जुना वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...