बहुजन वंचित आघाडीमुळे पवारांनी माढ्यातून पळ काढला – आनंदराज आंबेडकर

Anandraj ambedkar

सोलापूर: माढा आणि सोलापूरची खरी लढाई भाजप आणि बहूजन वंचित आघाडीत आहे, वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या सरसेनापतीने पळ काढल्याचंं, आनंदराज आंबेडकर यांनी म्हंटले आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारार्थ मोहोळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात, मात्र त्यांच्या काळातच अनेकांनी देशाला चुना लावून पळ काढला आहे. त्यामुळे चौकीदाराचीच चौकशी करायला हवी, अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली.

दरम्यान, आंबेडकर यांनी भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर देखील तोफ डागली आहे. स्वत:ला देव म्हणवून घेणाºया महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे, संसद हे महाराजांचे ठिकाण नाही, असाही खोचक सल्ला आंबेडकरांनी दिला.