मोदींनी गंगेत जावून पापक्षालन करावे – आनंद शर्मा

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायबरेली येथे राफेलवर सुरु असलेल्या वादावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी हे खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.त्यावर काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन मोदींना चोख शब्दात उत्तर दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेवून राफेल करारावरुन मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी नोटीस देण्याचीही मागणी केली आहे. पंतप्रधान कुंभच्या धार्मिक यात्रेला जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी गंगा नदीत जाऊन डुबकी घ्यावी, असे आनंद शर्मा म्हणाले. कुंभच्या धार्मिक यात्रेवर जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी पापक्षालन करायला हवं, त्यांनी पवित्र गंगा नदीत जाऊन स्नान केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.