राळेगणसिद्धीत ग्रामस्थांच्या वतीने आनंद साजरा

राळेगणसिद्धी: अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे राळेगणसिद्धीत विजयाची मिरवणूक काढण्यात आली. रामलिलावर २३ मार्च पासून मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यत उपोषणास बसले होते. सशक्त लोकपाल , लोकायुक्त , शेतकऱ्यांसाठी पेन्शन, कूषी मुल्य आयोगाची स्थापणा अण्णा हजारेंच्या आदी मागण्या मान्य झाल्या आहेत.

१) कृषी मुल्य आयोगाला स्वायत्त देण्यासाठी उच्च स्थरीय समीती स्थापन .
२) कृषी अवजारावरीला १२% वरील GST५% वर आणणार ३ महिन्यात अमलाबजावनी.
३) लोकपाल बाबत कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी माण्य करण्यात आली आहे .
४ ) निवडक सुधारणा बाबत विशेष सुधारणा करण्यात येण्यावर सरकार सकारत्मक.

२८ तारखेला राळेगणसिद्धी परिवाराने आत्मदहणाचा इशारा दिला होता.  अण्णा हजारे यांच्या तब्येतीची काळजी घेत उपोषणाच्या सातव्या दिवशी मागण्या मान्य करण्यात आल्या.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले. यावेळी राळेगणसिद्धी मधील ग्रामस्थांनी गुलाल उधळत , फटाके फोडत, ढोल वाजवत आंनद साजरा केला. संपूर्ण राळेगणसिद्धी मधील ग्रामस्थ महीला, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक मिरवणूकीत सहभागी होते.