आनंद परांजपेंनी कापलेला केक पाहून भाजपनेत्यांना मिरच्या झोंबणार

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या ‘चौकीदार ही चोर है’ या घोषणेभोवती यंदाची निवडणूक फिरत आहे. याच मुद्यावरून देशभरात विरोधकांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आनंद परांजपे यांनी याच मुद्द्याचा अनोख्या पद्धतीने वापर केल्याने परांजपे चर्चेत आले आहेत.

आनंद परांजपे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कापलेल्या एका केकमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘देश का चौकीदार ही चोर है’ असे वाक्य लिहिलेला केक आनंद परांजपे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कापला. त्यांच्या या कृतीने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आनंद परांजपे यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत हा केक कापला. त्यावर भावी खासदार असे सुद्धा लिहिण्यात आले होते.