चार ते पाच फूट पाण्यातून येत असलेली बोलेरो कार पाहून आनंद महिंद्राही झाले अचंबित

annad mnedra

गुजरात: सध्या अनेक राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. यातचा राजकोट आणि जामनगर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यातच महिंद्रा कंपनीच्या बोलेरो कार चालक या पाण्यातून कार चालवत असल्याचा एक तुफान व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहे.

गुजरातमधील पुराच्या पाण्यातून एक कार चालक आपली बोलेरो कार चालवल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. बोलेरो कार जवळपास चार ते पाच फूट पाण्यात आहे. पाण्याचा वेगही प्रचंड आहे. तरीही कार बंद न पडता पाण्याच्या वेगाचा प्रतिकार करत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं.

मात्र हि कार इतक्या सहज या पाण्यातून जात असल्याने सर्वचजण आश्चर्य व्यक्त करत आहे. परंतु हि कार पोलीस वाहन असून नागरिकांच्या मदतीसाठी जात असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आनंद महिंद्रांनी देखील हा व्हिडिओ रिट्विट केला असून त्यावर “खरंच की काय? हा आत्ताच्या पावसातला व्हिडिओ आहे का? मी खरंच आश्चर्यचकीत झालो आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरवर एका व्यक्तीनं गुजरातमधील पुराच्या पाण्यातून एक कार चालक आपली बोलेरो कार चालवल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. रस्त्यावर नदीच्या प्रवाहाप्रमाणं वेगानं पाणी वाहत असताना त्यातूनच बोलेरो कार सहजपणे घेऊन जाताना दिसत आहे. संबंधित कार एक पोलीस वाहन असून नागरिकांच्या मदतीसाठी जात असल्याचं सांगितलं जात आहे.

“महिंद्रा है तो मुमकिन है”, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आनंद महिंद्रांनी देखील हा व्हिडिओ रिट्विट केला असून त्यावर “खरंच की काय? हा आत्ताच्या पावसातला व्हिडिओ आहे का? मी खरंच आश्चर्यचकीत झालोय”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या