सोन्याची फेरारी पाहून आनंद महिंद्रा संतप्त, म्हणाले..

आनंद महिंद्रा

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विट्समुळे लोकप्रिय ठरत आहेत. आनंद महिंद्रा यांना ट्विटरवर आतापर्यंत ८४ लाख लोकांनी फॉलो केले आहे. विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे त्यांचे ट्विट्समुळे माध्यमांत नेहमीच चर्चा होत असते. सध्या त्यांची अशाच एका ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

आनंद महिंद्रांनी एक ट्वीट करत श्रीमंत लोकांना पैशांची उधळपट्टी आणि देखावा टाळण्याचा सल्ला दिला आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे सोन्याने मढवलेली अलिशान फेरारी कार फिरवणाऱ्या एका मूळ भारतीय-अमेरिकी नागरिकाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये एक सोन्याची अलिशान फेरारी कार दिसत आहे, त्यात दोनजण बसताना दिसत आहेत. व्हिडिओसोबत ऑडियो ऐकायला येत आहे. ट्वीट करत आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तुम्ही श्रीमंत असाल तर पैशांची उधळपट्टी कशी करू नये हे याचंच उदाहरण आहे. तरीही अशा गोष्टी सोशल मीडियावर का व्हायरल होतात मला कळत नाही’, असे म्हणत आनंद महिंद्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महिंद्रांच्या या ट्विटनंतर अनेक नेटकरी आपले मत व्यक्त आहे. अनेकांनी त्यांच्या मताशी सहमत असल्याचे देखील म्हंटले आहे. सोशल मीडियावर एक्टिव्ह असण्यासोबतच मदत कार्यात देखील आनंद महिंद्रा पुढे आहेत. कोरोना  काळात त्यांनी अनेक लोकांना मदत करण्याचे कार्य केले आहे. अनेक त्याच्या कामाचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP