‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची हत्या करण्यात आली असून त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले असल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.त्यानंतर कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या सांगण्यावरूनच दोन शिवसेना नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला व त्यानंतर त्यांच्या हत्या झाल्याही अशा शब्दात थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ या मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे.

नेमकं काय आरोप केलेत निलेश राणे यांनी वाचा त्यांच्याच शब्दात,

Loading...

“आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली. राणे साहेबांनीही पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलंय, त्याबद्दल कधी बोललो नाही. कारण आम्हाला आमची मर्यादा माहित होती. आणि आमचे राणेसाहेब बाळासाहेबांवर आजही एवढे प्रेम करतात, की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून, मी त्यांना साहेब जरी म्हणत असलो, तरी ते आधी माझे वडील आहेत. त्यांचा जाहीर कार्यक्रमात कुणी अपमान करत असेल, तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल.

आनंद दिघेंचं खरं काय झालं? कट कसा रचला गेला आणि त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलं. आणि हे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. त्या शिवसैनिकांना ठार मारायाचा बाळासाहेबांनी कुणाला आदेश दिला आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. जे दिघेसाहेबांबद्दल झालं, ते चुकीचं वाटलं शिवसैनिकांना म्हणून बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन त्या दोघांना ठार मारलं गेलं.

मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, मात्र राणेसाहेबांबद्दल जर कुणी खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, तर मी सहन करणार नाही. माझ्यासाठी राणेसाहेब महत्त्वाचे आहेत, बाळासाहेब माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. जेवढी मर्यादा आम्ही ठेवली होती, ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर ठेवली नाही.

त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेकवेळा सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना (सोनू निगम) विचारा, आज ते सांगतीलही. घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते. काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं, हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल, जाहीर सभेमध्ये सांगेन.

बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले? कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर? हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही. राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. बाळासाहेबांनी केलं, त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. पण आमच्या राणेसाहेबांचा मानसन्मान कुणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होतं. आम्हाला काही फरक पडत नव्हता. पण असे गल्लीबोळातले गटरछाप (विनायक राऊत) बोलायला लागले, तर आम्ही गप्प बसायचं?

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला