राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ; तपास यंत्रणांबाबत प्रश्नचिन्ह, राज्यसभा तहकूब

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय सूड घेण्यासाठी वापर होत असल्याच्या मुद्यावरून आज राज्यसभेचे कामकाज काहीवेळ तहकूब झाले.

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सीबीआय, ईडी या सारख्या संस्था भितीचे वातावरण तयार करत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावे, असे सांगत शर्मा यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांचा राजकीय सूड घेण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप केला. या मुद्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याने कामकाज काहीवेळ तहकूब करावे लागले.

भाषण करताना राहुल गांधी गडबडले; मोदीजी ‘बाहर जाते है’ ऐवजी ‘बार जाते है’चा उल्लेख

You might also like
Comments
Loading...