fbpx

नगरमध्ये संत भगवानबाबांच्या मूर्तीचा भाग जाळला,संतप्त भाविकांनी केला रास्ता रोको

अहमदनगर : संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग अज्ञात समाजकंटकाने जाळल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत या मूर्तीचं काम सुरु आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

संत भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्यामुळे भाविक संतप्त झाले आहेत. नगरमध्ये केडगाव बाह्य वळण रस्त्यावर भाविकांकडून रास्ता रोको करुन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.