मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली अज्ञात कार; कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

uddhav

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात सोमवारी(१३ सप्टें.)सायंकाळी एक अज्ञात कार शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सायंकाळी गृहविभागासोबतची बैठक संपवून आपल्या घराकडे निघाले असता त्याचवेळी एक अज्ञात कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली. तसेच ही गाडी मर्सिडिज कार असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी संबंधित मर्सिडिज कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार मलबार हिल दरम्यान एक मर्सिडिज बेंझ कार मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात शिरली आणि कारचा चालक वेगाने कार चालवत होता. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १७९ आणि १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या