तृणमूल नेत्याच्या घरी ईव्हीएम सापडल्या प्रकरणी एका अधिकाऱ्याचं निलंबन

ईव्हीएम

कोलकाता : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू असून यामध्ये आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ आणि पद्दुचेरी यांचा समावेश आहे. यामध्ये पश्चिम बंगाल मधील निवडणूक मोठी प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली आहे. यामध्ये थेट मोदी आणि ममता असा संघर्ष दिसून आला आहे.

दरम्यान या निवडणुकांमध्ये काही गैरप्रकार देखील आढळून आले आहेत या आधी गेल्या काही दिवसांपूर्वी आसाम मध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले होते. तर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे.

हा प्रकार हावडा येथील उलुबेरिया नॉर्थ मध्ये एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी घडला आहे. या घटनेनंतर गौतम घोष यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल आहे. त्यानंतर या प्रकरणात निवडणूक आयोगाने एका सेक्टर अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.  या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

महत्वाच्या बातम्या