हिंदत्ववादी भिडेंवर गुन्हा दाखल झाल्यानेच आकसापोटी आमच्यावर गुन्हा ; कबीर कला मंच

kabir kala manch pc

पुणे: शनिवार वाड्यावर ३१ डिसेंबरला घेण्यात आलेल्या एल्गार परिषद कार्यक्रम वेगळा होता आणि कोरेगाव भीमाचा वेगळा त्यामुळे एल्गार परिषदेतील भाषानांमुळे दंगल झाल्याचे आरोप निराधार असल्याचं एल्गार परिषदेच्या आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच दंगली भडकवणारे हिंदुत्ववादी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानेच कबीर कला मंचावर केवळ आकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी कबीर कला मंचाच्या ज्योती जगताप यांनी केला.

pc

एल्गार परीषेदेमध्ये गायल्या गेलेल्या गाण्यांमधील शब्द आक्षेपार्ह असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला गेला आणि त्यामुळे दंगल झाल्याचं सांगितलं जातं. मात्र आजवर अनेक ठिकाणी आम्ही हीच गाणी गायली आहेत तेव्हा कधी दंगल झालं नसल्याचं. यावेळी कबीर कला मंचकडून स्पष्ट करण्यात आलं. एल्गार परिषद ३१ तारखेला झाली गुन्हा दाखल करण्यात आला ८ तारखेला. यामध्ये दंगली प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे असलेलं भिडे आणि एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानेच क्रॉस कम्प्लेटसारखा गुन्हा दाखल करण्यात कबीर कला मंच आणि एल्गार परिषदेच्या आयोजकांवर आकसापोटी गुन्हे दाखल केले जाणार. हे आम्हाला आधीच माहित होत त्यामुळे आम्ही ४ जानेवारीलाच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असा अर्ज केल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे.