Britain | लंडन : ऋषी सुनक (Rushi Sunak) यांची सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. इतिहासात पहिल्यांदा भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटन (Britain) पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. यावेळी पेनी मॉर्डंट 100 खासदारांचा आवश्यक पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरल्याने शर्यतीतून बाहेर पडल्या. तर, सुनक यांना 190 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला.
सुनक हे ब्रिटनचे 57 वे पंतप्रधान असतील. देशाचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती असतील. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान देखील आहेत. मात्र, देशाचे अर्थमंत्री असताना ते क्वचितच आपल्या धर्माबद्दल बोलले.
सुनक यांचं जन्मस्थान पाकिस्तानच्या आधुनिक पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे आहे. मात्र, त्यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटीश-शासित भारतात झाला होता.
दरम्यान, सनक गुजरांवाला यांचे पंजाबी खत्री कुटुंब आहे, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी 1935 मध्ये नैरोबीमध्ये लिपिकाच्या नोकरीसाठी गुजरांवाला सोडले, असं ट्विट क्वीन लायन्स 86 या ट्विटर हँडलने केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | “जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत, ते आज…”; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Ramdas Kadam | “अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अन्…”, रामदास कदमांचा घणाघात
- Shambhuraj Desai | “राष्ट्रवादीला पुढील अडीच नाहीतर पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत…”; शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्ला
- MNS | “आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल”
- Irfan Pathan । ‘विराटने फटाके तर कालच फोडले होते’; इरफान पठाणने शेअर केला व्हिडिओ