एससी-एसटी प्रवर्गातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षा शुल्कात २४ टक्क्यांची वाढ

student exam maharashtra

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईने १०वी-१२वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आता पूर्वीच्या ५० रुपयांऐवजी बाराशे रुपये तर खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या साडे सातशे रुपयांऐवजी १५०० रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

सीबीएसई मंडळाने गेल्या आठवड्यातच या शुल्क वाढीची सूचना प्रसिद्ध केली आहे. ज्या शाळांनी जुन्या नियमानुसार परीक्षा नोंदणी केली असेल, त्यांनी विद्यार्थ्यांकडून नव्या नियमानुसार वाढीव शुल्क वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शंभर टक्के दृष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

३०० रुपये जादा १२ वी बोर्डाच्या परीक्षेतील अतिरिक्त विषयासाठी एसी, एसटी विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी अतिरिक्त विषयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येत नव्हते. अतिरिक्त विषयांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५० रुपयांऐवजी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अंतिम तारखेच्या अगोदर नव्या दरानुसार जे विद्यार्थी शुल्क जमा करणार नाहीत, त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणार नसल्यामुळे २०१९-२० च्या परीक्षेसाठी त्यांना बसता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या