महिलांच्या सन्मानासाठी राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने महिलांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व पेट्रोल पंपवरील शौचालय सर्व महिलांसाठी उपलब्ध होणार आहेत, याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.

महिलांना शौचालयबाबतीत कुचंबणा  होत असते. याबाबत नीलम गोऱ्हे या सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यांनी या प्रश्नावरून  ग्रामविकास, परिवहन, अन्न व नागरी, मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. मागील बैठकीत पेट्रोल पंपांवर सर्व महिलांसाठी त्यात ग्राहक असो व नसो त्यांना पेट्रोल पंपावर शौचालय वापरण्यासाठी देण्यात यावे अशा निर्देश दिले होते. यावर अन्न व नागरी विभागाने तात्काळ कारवाई करत सर्व पेट्रोल पंपावर शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे याबाबत पेट्रोलियम असोसिएशनला आदेश दिले आहेत.

तर ज्या गावात आठवडी बाजार आहेत त्याठिकाणी मोबाईल शौचालय उपलब्ध करून देण्यात यावी असे गोऱ्हे यांनी ग्रामविकास विभागास दिल्या. शाळा, ग्रामपंचायत, तलाठी सज्ज तसेच  सार्वजनिक ठिकाणी महिला जे काम निमित्ताने यात असताना त्यासाठी स्वच्छताघरे  निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात यावे अशी सूचना देखील गोऱ्हे यांनी केली.