राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

टीम महाराष्ट्र देशा- ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ, दारुचा अवैध साठा तसंच विक्री प्रकरणी शिक्षेत वाढ करण्यासाठी दारुबंदी अधिनियमात सुधारणा, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राची स्थापना, विघटनशील अर्थात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान, अशा अनेक निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

याशिवाय अघोषित प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या तसंच घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. यापूर्वी २० टक्के अनुदान मंजूर असलेल्या शाळा तसंच तुकड्यांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला.

मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेचा दुसरा तसंच तिसरा टप्पा राज्यात राबवण्यासही मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. या योजनेच्या अंमलबजावणीत ७५ हजार कृषी पंप बसवण्यात येणार असून त्यासाठी एक हजार ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. योजना प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून १८ महिन्यात ती राबवण्यात येणार आहे. या दोन्ही टप्प्यात शेतकऱ्यांना तीन, पाच, तसंच साडे सात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.

शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातल्या आंतरवासितांचं विद्यावेतन सहा हजार रुपयांवरून अकरा हजार रुपये करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

महत्वाच्या बातम्या