लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस-नरेंद्र मोदी

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहे.

दरम्यान, अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांचे ट्विट

“संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मला खात्री आहे माझे सहकारी खासदार यावेळी उपस्थित राहून विधायक, व्यापक आणि विनाव्यत्यत चर्चा करतील. देशातील जनतेचं आपल्यावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे जनता आणि घटनाकारांना अपेक्षित कामगिरी करु”

तर , अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणलाय.

अविश्वास प्रस्ताव : सेना-भाजपचे ‘हम साथ साथ है’!

जखमी युवकाला भेटताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात पाणी