निवडणूक आयोगाची फसवणूक करणा-या एमआयएम नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद : निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर करताना संपत्तीचा उल्‍लेख न करता आयोगाची फसवणूक करणा-या एमआयएमच्या नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांच्याविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महापालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यावेळी कादरी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मकसूद कॉलनी येथील 1394 चौ.मी.च्या भूखंडाची माहिती जाणीवपूर्वक लपविली. हा भूखंड त्यांच्या नावे असूनही त्यांनी निवडणूक आयोगाची आणि जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शपथपत्रात या संपत्तीचा उल्लेख केला नाही. म्हणून आयोगाच्या निर्देशानुसार पोलिसांनी नगरसेवक कादरीविरूद्ध बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे

You might also like
Comments
Loading...