वंदे मातरमचा अवमान करणा-या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद :   महानगरपालिका सभागृहात वंदे मातरम् चालू असताना बसून राहणारे एमआयएमचे नगरसेवक शेख जफर  शेख अख्तर,  सय्यद रशिद मतीन यांच्या विरोधात येथील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंदेमातरम चालू असताना बसून राहिल्याने महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ व मारामारीपर्यंत प्रकरण गेले होते. तीन नगरसेवकांना महापौरांनी या गोंधळानंतर निलंबित केले होते. या प्रकरणात महानगरपालिकेचा सुरक्षा रक्षक बाबु सांडु जाधव याच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बहुचर्चित प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.