शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप उपमहापौरांविरोधात गुन्हा दाखल

सकल मराठा समाजाचे प्रदेश सदस्य यांचे भिंगार शहर बंदचे आवाहन

नगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांसह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली.

शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सकल मराठा समाजाचे प्रदेश सदस्य यांनी भिंगार शहर बंदचे आवाहन केले आहे. शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नगर महापालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराजांबद्दल घाणेरड्या भाषेचा वापर केला आहे. छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून श्रीपाद छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते.

संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. त्यामुळे सत्तेत आणि उपमहापौर पदावर असलेल्या छिंदान यांना राग अनावर झाला. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व शिवजयंतीबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरली. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केली असून गंभीर दखल घेतली आहे.

You might also like
Comments
Loading...