टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान (Pakisthan) आणि बांगलादेश (Bangladesh) यांचा सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाला पराभूत करत अंतिम चार मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. परंतु, या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान यांच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान दोघेही सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसत होते. दरम्यान, बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात या जोडीच्या नावावर एक लाजिरवाणी विक्रमाची नोंद झाली आहे. या दोघांनी आज बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये कासवाच्या गतीने पहिल्या विकेटसाठी प्रथमच अर्धशतकीय भागीदारी केली.
टी 20 विश्वचषक (T20 World Cup) मध्ये ‘या’ खेळाडूंच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान या दोघांनी पाकिस्तानसाठी 63 हिंदू मध्ये 67 धावा केल्या. या दोघांनी खेळलेली ही अर्धशतकीय पारी आजपर्यंत सर्वात संथ गतीने केलेली अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. हे दोघे मैदानात असताना पाकिस्तान संघाचा धावसंख्या दर प्रतिशटक 5.42 होता. बाबर आझम या सामन्यांमध्ये 13 चेंडूमध्ये 25 धावा काढून बाद झाला. बाबर आझमच्या रूपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला होता.
बाबर आझम 11 व्या षटकात बाद होताच मोहम्मद रिझवान 12 व्या षटकात बाद झाला. मोहम्मद रिजवानने या सामन्यामध्ये 32 चेंडूत 32 धावा केल्या. आज झालेला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हा सामना कोणत्याही उपांत्य फेरीपेक्षा कमी नव्हता. कारण आज जो संघ जिंकेल त्याला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार होते. आजचा सामना जिंकून पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
भारताने गट दोन मधून उपांत्य फेरीचे तिकीट आधीच मिळवलेले असून, आता पाकिस्तान देखील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरत आहे. तर दुसरीकडे गट एक मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane | “कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार?” , नारायण राणे उद्धव ठाकरेंवर कडाडले
- Uddhav Thackeray । “मशाल भडकली आणि…”; ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
- Eyebrow Care | जर तुम्हाला आकर्षित आयब्रो पाहिजे असतील, तर ‘या’ टीप्स करा फॉलो
- IND vs ZIM ICC T20 | भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा ; 71 धावांनी झिम्बाब्वेवर मात
- NCP । “पन्नास खोके घेतल्याने बोके माजलेत”; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदे गटावर घणाघात