वाळूजमध्ये चोरट्यांचा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला

Rs 12,500 stolen from SBI Bank ATM in Parbhani; case filed in Nanalpeth police

औरंगाबाद : शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहे. घरफोडीसह आता चोरांनी शहरात असलेल्या एटीएमकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. गजबजलेल्या वाळूज महानगरात कुलूप तोडून चक्क एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये वेगळीच भीती पसरली आहे.

वाळुज महानगर २ मधील इन्फीनीटी या इमारतीत असलेल्या एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न ११ सप्टेंबर रात्री ९.४० ते १२ सप्टेंबर सकाळी ७ वाजेच्या दरम्यान करण्यात आला. या चोरीच्या प्रयत्नात चोरटयाने एटीएमचे कुलूप तोडून मशीनच्या वरचे कव्हरचे नुकसान केले.

या प्रकरणी सुनिल रामदास राजपुत (५३, रा. शहानुरवाडी) याच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी हि वाळूजमध्ये दोन वेळेस एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. तर दोन वर्षापूर्वी बीड बायपास येथून एटीएम मशीन पैस्यांसह चोरून नेले होते.

महत्त्वाच्या बातम्या