स्वातंत्र्य दिनाच्या मोदींच्या भाषणासाठी नागरीकांना आपले विचार पाठवण्याचं आवाहन

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या स्वातंत्र दिनाच्या अनुषंगानं त्यांच्या भाषणासाठी देशातल्या नागरीकांना आपले विचार पाठवण्याचं आवाहन केलं आहे. नागरीक आपले विचार नमो ॲपच्या माध्यमातून पाठवू शकतात असं मोदी यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान या महिन्याच्या अखेरच्या रविवारी, येत्या २८ तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ५५ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावरुन तसंच ‘मायगव्ह ओपन फोरमद्वारेही’ आपले विचार कळवता येतील.Loading…
Loading...