फुलंब्री तालुक्यात पेरणी करतांना वीज पडून अठरा वर्षीय तरुणी ठार

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान वादळी वारा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसात बाभुळगाव तरटे येथे वीज पडून अठरा वषीय तरुणीचा मृत्यू झाला तर एकविस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच वीज पडून सात शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे.

समृद्धी विष्णू तरटे (वय १८) असे विज पडुन ठार झालेल्या तरुणीचे नांव आहे. तर शितल रोहित तरटे (वय २१) जखमी झालेल्या विवाहितेचे नांव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाभुळगाव तरटे शिवारातील ग.क्रमांक ८४ व ८५ मध्ये मका पेरणीची कामे सुरु होते. समृद्धी तरटे व शितल तरटे मका पेरणी असतांना पाऊस या पाऊस सुरु झाल्याने आडोशाला बसलेल्या होत्या. त्यांच्यावर विज कोसळली यात समृद्धी तरटे हिचा जागीच मृत्यू झाला.

तर शितल तरटे ही गंभीर जखमी झाली आहे. समृद्धीचा मृतदेह शेवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तसेच भगवान कडुबा तरटे यांची एक गाय व बैल मयत झाले आहे. त्याचप्रमाणे लोहगड नांद्रा येथे विज पडुन ७ शेळ्या ठार झाल्या असल्याची माहिती तलाठी रविंद्र मुखेडे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP