घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा

blank

श्रीनगर : रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लघन न करण्याचे आदेश सरकारकडून लष्कराला देण्यात आले आहेत. स्त्रसंधीचे उल्लघन न करण्याच्या आदेशामुळे पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये वाढ झालीये.

दरम्यान आज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 दहशतवाद्यांना, काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर ठार करण्यात भारतीय जावांना यश आलंय.केरान सेक्टरमध्ये लष्करानं त्यांना ठार केलं आहे. ही कारवाई अद्याप सुरूच असल्याचं वृत्त आहे.