Amruta Fadanvis | अमृता फडणवीस यांच्या ‘मूड बनालिया’ गाण्याला 3 कोटी व्ह्यूज, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amruta Fadanvis | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) नेहमी चर्चेत असतात. सध्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आल्या आहे. यावेळी त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहे. त्यांचा ‘मूड बनालिया’ (Mood Banaleya) हे गाणं नुकताच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला तब्बल 3 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावर नेटकरी मजेशीर कमेंट्स देखील करत आहे.

अमृता फडणवीस यांचा नुकतंच रिलीज झालेलं ‘आज मैं मूड बना लिया’ गाणं एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यामध्ये प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज बघायला मिळाला आहे. या गाण्यामध्ये त्यांनी डान्स देखील केला आहे. त्यांचं गाणं ऐकून आणि डान्स बघून नेटकरी कमेंटच्या माध्यमातून त्यांची खिल्ली उडवत आहे.

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “हे गाण ऐकून 5 वर्षापासून कोमात असलेले माझे मामा कोमातून बाहेर आले…. त्यांनी उठून स्वत:च्या हाताने TV बंद केला….Thank you so much.” तर अजून एक वापरकर्ता म्हणाला, “मी आता म्हशींच्या🐃 गोठ्यात आहे…मामींचे हे गाणे लावला… तेव्हढ्यात माझी आजी घरातुन ओरडली…*” अरे मेल्या ..त्या म्हशीला चारा टाक.. ती बघ कशी हंबीरडतेय…🐃🐃🐃.” पुढे एक नेटकरी म्हणाला, “हे गाणं विधानसभेत दाखवल पाहिजे शिंदे गटातले आमदार पुन्हा महाविकास आघाडी मध्ये पळून येतील😁”. आणखी एकाने कमेंट केली आहे, “गाण्याचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने राज्यीय सुट्टी जाहीर केली आहे.” नेटकरी अशा प्रकारच्या कमेंट्स करत अमृता फडणवीस यांच्या गाण्याची खिल्ली उडवत आहे.

नेटकऱ्यांनी युट्युबवर केल्याला काही भन्नाट कमेंट्स वाचा –