महाराष्ट्र देशा डेस्क: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जितक्या जास्त प्रमाणात राजकारणात ऍक्टिव्ह असतात तितक्याच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आणि कलेच्या दुनियेत ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच त्या झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी केलेली विधानं बरीच चर्चेत आहेत. यातच आता या भागाचा एक नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यावर नेटकरी विविध कॉमेंट्स करत आहेत.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना सुबोध भावे याने एक प्रश्न विचारला, ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर तुमच्या समोर कोणाचा चेहरा येतो? यावर त्या पटकन हात जोडतात आणि म्हणतात की, “श्री. उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान, सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला.” तर त्यांचं हे थेट उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षकही थक्क होऊन जातात.
मंगळसूत्र का घालत नाही?
यावेळी अमृता फडणवीस यांना तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर तुमच्या सासूबाई तुम्हाला ओरडत नाहीत का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, “मला माहित आहे कि मंगळसूत्र हे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतिक आहे. पण मला वाटतं कि आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हात पकडावा त्यामुळे मी मंगळसूत्र गळ्यात न घालता ते हातात घालते. त्यामुळे मला सतत वाटत राहत कि देवेंद्रजींनी माझा हात धरला आहे. ही खूप छान फिलिंग आहे.” तर त्यांच्या या विधानाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे हा सूत्रसंचालक आहे. या कार्यक्रमाचा फॉरमॅटच असा आहे कि, इथे विविध स्त्री सेलिब्रिटी येतात आणि त्यांना जनतेच्या मनातील प्रश्न विचारले जातात. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात खासदार सुप्रिया सुळे या सहभागी झाल्या होत्या. तो भागही प्रचंड गाजला होता. तर येत्या भागात मिसेस उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. या भागाचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Nana Patole | भाजपचा देश विकून कारभार सुरु आहे – नाना पटोले
- Deepak Kesarkar । आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा नारायण राणेंचा कट; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप
- Kareena Kapoor | सीतेच्या भूमिकेसाठी करिनाने मागितले १२ कोटी?; नक्की काय म्हणाली करीना कपूर
- Yashomati Thakur | महागाई आणि दडपशाही या मोदीनितीचा निषेध – ॲड. यशोमती ठाकूर
- Ranveer singh | न्यूड फोटोशूटनंतर रणवीरला आली एका अनोख्या शूटची ऑफर; ‘पेटा’ने पाठवले पत्र
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<