‘वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही..क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’

amruta fadnavis

मुंबई : २०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून विरोधी विचारधारेच्या राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ घेतली. या तीन भिन्न विचारांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, सर्वाधिक जागा येऊनही विरोधी पक्षात बसावे लागल्याने भाजपने हे सरकार लवकरच पडेल असं भाकीत अनेकदा वर्तवलं आहे.

तर, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील महाविकास आघाडीला लक्ष्य करत असल्याचं अनेकदा दिसून आले आहे. यामुळे अनेकदा त्या वादाच्या भोवऱ्यात देखील सापडल्या आहेत. आता त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीपासून ते वसुली प्रकरणापर्यंत भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी एका हिंदी चारोळी मार्फत कोडं टाकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केला आहे.

‘पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही.. अवाम से कभी मिलता नही.. सत्य और कर्म की राह पर चलता नही.. वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही.. महामारी का कहर उससे सम्हलता नही.. प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’ असं ट्विट करून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :