Share

Amruta Fadanvis | “…म्हणून मोदी आणि वरच्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं”; अमृता फडणवीसांनी सांगितलं कारण

Amruta Fadanvis | नाशिक : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना नरेंद्र मोदींनी आणि पक्षातील वरिष्ठांनी मुख्यमंत्रीपद का दिल होतं? याचा खुलासा केला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही.”

पुढे त्या म्हणाल्या, ही आमच्यात कमतरता नाही, पण आम्ही असं करत नाही. आमची ती महानता तशीच दिसून येते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना न मागता मुख्यमंत्री पद दिलं होतं. त्यांनी कधीच हे पद मागितलं नव्हतं. “देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असं अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी म्हटलं.

ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्या दरम्यान प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे इत्यादीही उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

Amruta Fadanvis | नाशिक : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now