अमृता-सोनालीच्या डान्सची सोशल मीडियावर चर्चा; पाहा व्हिडीओ

amrutaa khanvlkar

मुंबई :  मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी तसेच मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. अमृताने हिंदी रिऍलिटी शॉ देखील केले आहेत. अमृता तिच्या सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सध्या अमृता आणि सोनाली खरेचा सुंदर डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

नवरात्रीनिमित्त सोनाली आणि अमृताने एका गाण्यावर ताल धरल्याचं पाहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींही ‘बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या देखील पसंतीस येत असून यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, सोनाली आणि अमृता या दोघींही आपल्या उत्तम अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. दोघींही फिटनेस बाबत देखील नेहमी जागरूक असल्याचे पाहायला मिळते. सोशल मिडीयावर वर्कआऊटचे व्हिडीओ देखील त्या शेअर करत असतात.

महत्त्वाच्या बातम्या