अमृता खानविलकर आणि आशिष पाटील यांचा ‘माउली’ नृत्याविष्कार विठ्ठलाला अर्पण

मुंबई: २० जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यातील पायी चालत पंढरपुरला येतात. मात्र कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या दिवशी पायी वारीला सरकारने परवानगी नाकारली आहे. यामुळे भावीक जवळ असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात दर्शन घेत आहेत.

आषाढीच्या पार्श्वभूमिवर अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी “माउली’ या गाण्यावर पदन्यास करत विठ्ठलाला नृत्यविष्कार अर्पण केला आहे. यामध्ये ‘माउली माउली’ या गाण्यावर हे दोघे थिरकताना दिसून येत आहे. त्यांच्या नृत्याला समाज माध्यमावर तुफान पसंत केले जात आहे. या नृत्याविष्काराचा व्हिडीओ अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमृताच्या मनमोहक अदा आणि तिचे सौंदर्य अजूनच खुलून आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड पसंत केला जात आहे.

अमृताने नुकतीच ‘अमृतकला’ ही सिरीज सूरू केली आहे. या सिरीजमध्ये ती वेगवेगल्या अंदाजातील नृत्य व्हिडीओ शेअर करत असते. या अगोदरही तिने आशिष पाटील सोबत ‘नटरंग उभा’ या गाण्यावर नृत्याविष्कार केला होता. हा व्हिडीओ समाज माध्यमावर खूप गाजला होता.आता तिने परत एकदा आशिष पाटिल सोबत ‘माउली’ हा नृत्याविष्कार केला आहे. अभिनेत्री सायली संजीव या अभिनेत्रीने अमृताचा व्हिडिओ शेअर करत तीच्या नृत्यविष्काराला दाद दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP