अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा– सोशल मिडीयावर अभिनेते, अभिनेत्री, नेते, खेळाडू यांना नेहमीच ट्रोलचा सामना करावा लागतो.
नेहमीच चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील यातून सुटल्या नाहीत. .
ख्रिसमस निमित एका खासगी वाहिनीच्या चॅरिटी कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे काही फोटो त्यांनी ट्विटर अकाऊंट शेयर केले. या पोस्ट वरून त्यांना ट्रोलचा सामना करावा लागला आहे.

अनेकांनी त्यांना ट्रोल असून त्यांचा कार्यक्रमातील उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारची सामाजिक कामे गणपती व दिवाळी मध्ये देखील करत जा असा फुकटचा सल्ला देखील अमृता फडणवीस यांना ट्विटर वर देण्यात आला आहे. अमृता फडणवीस लग्नापूर्वी हिंदू होत्या का ?असा प्रश्न देखिल एका युजरने विचारला आहे.Loading…
Loading...