पंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख “राष्ट्रपिता” असा केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरावरुन टीका होत आहे.

मोदींना यांना शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केले की, ‘आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी खूप परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’.त्यांनी या ट्विटसोबत त्यांच्या आवाजातील ‘ओ रे मनवा तू तो बावरा है’, हे स्वत:च्या आवाजात गायलेलं गाणे ट्विट केले आहे. या ट्विटनंतर अमृता फडणवीस यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले.

दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे सर्वत्र देशातून आणि जगातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सिने कलाकारांनी आणि खेळाडूंनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी आज आपला वाढदिवस आपल्या कुटुंबियांसाबोत म्हणजे आई सोबत साजरा केला आहे. तर आई बरोबर जेवणाचा आस्वाद देखील घेतला. याबाबतचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच झळकत आहेत.