Share

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंचं ते ट्विट अमृता फडणवीसांनी केलं रिट्विट; म्हणाल्या…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कालचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातोय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होत. काल दोन्ही मेळावे पार पडले. यानंतर आज दिवसभर देखील याच मेळाव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अशातच काल एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्या आधी एक ट्विट केलं होत. या ट्विटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती.

काय होत एकनाथ शिंदेंचं ट्विट?

मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे, प्रसिद्ध लेखक हरिवंशराय बच्चन यांची ही म्हण शेअर केली आहे. त्यांनी ‘विचारांचे वारसदार’ हा हॅशटॅगही वापरला होता.

अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया-

साय ६ च्या सुमारास हे दोन्ही मेळावे सुरु झाले. यानंतर आठ वाजल्याचा दरम्यान उद्धव यांचं भाषण सुरु झालं. उद्धवजींचं भाषण सुरु असतानाच अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंनी केलेलं हे ट्वीट कोट करुन रिट्वीट करत प्रतिक्रिया नोंदवली. “याच बदलाची आज महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे. आपल्या राज्याला आणि देशाला जो बदल पाहण्याची अपेक्षा आहे तो तुम्हीच आहात एकनाथ शिंदेजी, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

दरम्यान, याआधी शिवसेनाच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकरणात चांगलीच आफडा-तफड माजवली होती. सर्व पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. मात्र, याचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला. त्यामुळे एकनाथ शिंदे गट मोठी गर्दी जमवण्यासाठी खाटापीट करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कालचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातोय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ …

पुढे वाचा

Education Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now