‘मै मस्तानी हो गई’ अमृता फडणवीसांचा आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स सोशल मिडीयावर व्हायरल

मुंबई: आजवर आपण महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी अमृता फडणवीस यांची गाणी ऐकलेली आहेत. मात्र सध्या एका घरगुती कार्यक्रमात मिसेस फडणवीस यांनी आपल्या मुलीसह आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स देत, बाजीराव-मस्तानी चित्रपटातील मै मस्तानी हो गई या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, नेटीझन्सकडूनही अमृता फडणवीस यांच्या डान्सचं कौतुक केलं जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेचा विषय असतात. मग कधी अमिताभ बच्चन यांच्या सोबतच गाण असो कि कधी नदी बचाव उपक्रमासाठीचा अल्बम. मध्यंतरी बई-गोवा बोट उद्घाटनावेळी काढलेला सेल्फी अमृता यांच्या चर्चेचाल विषय बनला होता.

दरम्यान, आता अमृता यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम  अकाऊँटवरुन घरगुती कार्यक्रमात डान्स करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याव्हिडीओमध्ये अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्या दिविजा बाजीराव-मस्तानी चित्रपटातील मै मस्तानी हो गई डान्स केला आहे.