मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या टिप्पणीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला असून यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण(Vidya Chavhan) यांनी याचा निषेध करत थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, याप्रकरणी आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याहीन चव्हाण,आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण. विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण’, असे खडे बोल फडणवीसांनी चव्हाण यांना सुनावले आहेत.
आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान,
ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण ,
आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण !@Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि
सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण ! pic.twitter.com/Ydf7Z3aIEy— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 7, 2022
दरम्यान, अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधत विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या की,’भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं.’
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<