अमरावती विद्यापीठात शिक्षक मंच व न्यूटा आमने-सामने 

department-of-computer-science-sgb-amravati-university

अमरावती : विद्यापीठ कायद्यात बदल झाल्यानंतर यावर्षी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात नवीन बदला सह निवडणूक होणार आहे.  विद्यापीठाच्या आधिकार मंडळाची (सिनेट)निवडणूक होणार असून शिक्षक मंच व न्यूटा यांच्यात एकूण दहा जागेसाठी लढाई होणार आहे.

यावर्षी शिक्षक मंचाने पूर्ण दहा जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ आणि अखिल भारतीय विदयार्थी परिषदेच्या मुखातून आलेले प्राध्यापक व विद्यार्थी शिक्षक मंचाचे नेतृत्व करतात. या संदर्भात अभाविप प्रांत अध्यक्ष स्वप्नील पोतदार म्हणाले विद्यापीठात सिनेट पदासाठी आम्ही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिले नसून जे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच भविष्यात विद्यापीठातील अडचणी सोडवतील आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावतील. यांनाच उमेदवारी दिली आहे.