मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

navneet rana kaur

अमरावती : खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. आणि आज नवनीत राणा यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या बातमीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबद्दल स्वतः नवनीत राणा यांनी दिली आहे. ‘माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा ,शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे’. अशी फेसबुक पोस्ट नवनीत राणा यांनी केली आहे.

पती आमदार रवी राणा हे नागपूरला त्यांच्या आई वडिलांच्या सेवेत आहेत. अशात नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कशाला हवेत कोचिंग क्लास, ‘हा’ पठ्ठ्या कोचिंगविना दुसऱ्याच दणक्यात झाला आयएएस

बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 10 जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांना आज देखील जामीन नाहीच!