fbpx

अमरावती : अन्न व औषध प्रशासनाने केला १५ ट्रक गुटखा नष्ट

अमरावती – महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही राज्यात सर्वत्र गुटखा मिळत असल्याचे वारंवार समोर येत आहे. अमरावती शहर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये मोठ्याप्रमाणावर गुटखा जप्त केला होता. आता या कारवाईत जप्त केलेला सुमारे १५ ट्रक गुटखा नष्ट केला आहे.

सुकली कंपोस्ट डेपो, येथे हा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. या गुटख्याची किंमत ३ कोटींच्या आसपास असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची निर्मिती आणि विक्री केली जात असल्याचे वारंवार समोर येत असताना कायद्याची भीती म्हणावी तितकी नसल्याचं दिसून येत आहे.