fbpx

बसपा कार्यकर्ते आक्रमक, नेत्यांना कपडे फाटेपर्यंत धुतले

टीम महाराष्ट्र देशा : बसपाच्या नेत्यांना बसपा कार्यकर्त्यांनी पार कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अमरावतीत ही घटना घडली असून, शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, निवडणुकीत महाराष्ट्र बसपाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीत झालेल्या पराभवा बाबत आढावा घेण्यासाठी तसे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांनी अमरावती शासकीय विश्राम गृहात बैठकीचे आयोजन केले होते.

दरम्यान, ६ महिन्यांपूर्वी अमरावतीत झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत बसपाच्या चारही नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार प्रवीण कुटे यांना मतदान किले असा आरोप करत, बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांनी नगरसेवकांना आदेश दिले तसेचं त्यांनी प्रवृत्त केले. असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

त्यावेळी, या सर्व प्रकरणाबाबत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांना जवाब विचारला असता ते जवाब देण्यात असमर्थ ठरले. त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी प्रभारी संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी पार कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली.

संदीप ताजणे, सुरेश रैना, कृष्णा बेले आणि चेतन पवार या नेत्यांना कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. दरम्यान, संदीप ताजणे यांना घटनास्थळावरून पळून जावे लागले.