fbpx

संतापजनक : सरकार विरोधात बोलत असल्याने अमोल पालेकरांचं भाषण आयोजकांनी थांबवल

टीम महाराष्ट्र देशा : नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण सुरु असताना ते सरकार विरोधी बोलत असल्याचं लक्षात आल्याने आयोजकांनी त्याचं भाषण थांबवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.पालेकर हे सरकारवर टीका करत असल्यानेच , आयोजकांनी त्यांना रोखलं.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बरवे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यातील ‘इनसाईड द एम्प्टी बॉक्स’ या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार अमोल पालेकर यांनी हजेरी लावली होती त्यावेळी ते बोलत असताना हा सगळा प्रकार घडला आहे.

भाषण करत असताना पालेकरांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाला विरोध करत टीका केली. त्यावेळी त्यांना कार्यक्रमाच्या मॉडरेटरने टीका करण्यापासून रोखलं.

ज्याप्रमाणे नयनतारा सेहगल यांना निमंत्रण देऊन नंतर त्यांना बोलण्यास नकार देण्यात आला. त्याचप्रणाणे तुम्ही मला बोलण्यापासून रोखत आहात का?, असा सवाल पालेकरांनी मॉडरेटरला केला. या घटनेचा आता सगळ्याच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.