मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनीही ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रात आता रामराज्य आले. भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार. काय ती झाडी काय तो डोंगार? एकदम ओके सरकार “, असा टोला मिटकरी यांनी ट्वीट करत लगावला आहे.
महाराष्ट्रात आता रामराज्य आले . भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले.
इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार ! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार .
काय ती झाडी काय तो डोंगार ?
एकदम ओके सरकार— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 30, 2022
दरम्यान सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Aaroh Welankar : “जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आरोह वेलणकरचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- AUS vs SL : नॅथन लायनचा वर्ल्ड रेकॉर्ड..! दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नची केली बरोबरी
- IND vs ENG : कोहली चालता-चालता अचानक थांबला अन् कॅमेरामनला विचारले, ‘ काय चालू आहे…’
- Corporation Election 2022 : सत्तेचे फासे पलटले; लवंडेंचे काय होणार?
- Deepak Kesarkar : “उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला नाही”, दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<