Share

Amol Mitkari | “चळवळीत ‘या’ चार परिक्षा द्यावा लागतात, आव्हाड साहेब…”, अमोल मिटकरींनी केली आव्हाडांची पाठराखन

Amol Mitkari | मुंबई : हर हर महादेव प्रकरणी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत सापडले आहेत. भाजप पक्षाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्याने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं घोषित केलं आहे. अशातच राष्ट्रवादी (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची पाठराखन केली आहे.

भय ,भ्रम,चरित्र आणि हत्या ही मनुवाद्यांची चार हत्यारं आहेत. असे डॉ.बाबासाहेब म्हणाले होते. चळवळीत चारही परीक्षा द्याव्या लागतात. आव्हाड साहेब आपण शिव शाहु फुले आंबेडकरांचे सच्चे वारसदार आहात, असं अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Amol Mitkari | मुंबई : हर हर महादेव प्रकरणी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत सापडले आहेत. भाजप पक्षाच्या महिला …

पुढे वाचा

Entertainment Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now